पाबलो
पिकासो याचे
'कला हे एक
असत्य आहे, पण
त्यातून
आपल्याला
सत्याचा शोध
घेता येतो' हे
वचन प्रसिद्ध
आहे. श्रेष्ठ
कलाकृती आपली
जीवनविषयक
जाण समृद्ध
करून जाते.
'बायसिकल थीफ'
बघणे हा
माझ्या
दृष्टीने
असाच एक जीवन
समृद्ध
करणारा अनुभव
होता.
वित्तोरिओ द
सिका या
इटालियन
दिग्दर्शकाचा
हा चित्रपट.
१९४८ सालचा. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पराभूत, मंदीने ग्रासलेल्या इटलीच्या पार्श्वभूमीवरचा हा चित्रपट. नायक आहे अँटोनियो रिची. दोन वषेर् बेकार असलेला. कशीबशी त्याला एक नोकरी मिळते. रस्त्यावरच्या खांबांवर सिनेमाची पोस्टर्स चिकटवायची. पण या नोकरीसाठी स्वत:ची सायकल असणे अत्यावश्यक असते, जी याच्याकडे नसते. शेवटी त्याची भांडखोर पण प्रेमळ बायको मारिया लग्नात आहेर मिळालेल्या चादरी विकते. त्या पैशातून अँटोनियो सायकल विकत घेतो. दुसऱ्या दिवशी खूप उत्साहाने कामाला निघतो. दुदैर्वाने त्याच दिवशी त्याची सायकल कोणीतरी पळवतो. जंग जंग पछाडूनही ती सापडत नाही. हताश झालेला अँटोनियो शेवटचा एक प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा आपल्या ब्रूनो या आठ वर्षाच्या मुलासह बाहेर पडतो. शेवटी एकदाचा तो चोर अँटोनियोला सापडतो. चोराच्याच झोपडपट्टीत. पण आजूबाजूचे लोक चोराचीच बाजू घेतात.
विमनस्क अवस्थेत भटकत असतानाच त्याची नजर समोर एका भिंतीला लावलेल्या सायकलींवर पडते. मनाचा हिय्या करून त्यातली एक तो पळवतो; पण दुदैर्वाने रंगेहात पकडला जातो. लोक त्याला मारहाण करू लागतात. ब्रूनो गयावया करत मध्ये पडतो. तेवढ्यात सायकलचा मालक तिथे येतो. ब्रूनोला पाहून त्याला दया येते. तो अँटोनियोविरुद्ध पोलिसात तक्रार करायची नाही असे ठरवतो. जमाव अँटोनियोला सोडून देतो. पण मुलासमोर आपण चोर ठरलो, याचा अपमान लोकांच्या मारापेक्षा त्यला जास्त झोंबतो. सायकल गेली, नोकरी गेली आणि आता आत्मसन्मानही गेला. लहानग्या ब्रूनोला बापाची अगतिकता समजते. अँटोनियोची रस्त्यात पडलेली, चिरडलेली हॅट तो धावत जाऊन आणतो, सारखी करतो. अँटोनियो ती डोक्यावर चढवतो. हॅटबरोबर जणू त्याच्या आत्मसन्मानाचीही पुन:स्थापना होते. हातात हात घालून बापलेक चालू लागतात. इथे कथा संपते. जगात निखळ पांढरे आणि निखळ काळे असे काही नसते, असते ती या दोन्हींची सरमिसळ, हे दाखवत चित्रपट आपली जीवनविषयक जाण अधिक समृद्ध करून जातो.

Hurt
people,
hurt
people दुखावलेली
माणसेही,
दुखवू शकतात)
हे
चित्रपटातले
आणखी एक आगळे
दर्शन.
सुरुवातीला
अँटोनियोची
सायकल
चोरणाराही
अगतिकच असतो
आणि मग
दुखावलेला
अँटोनियो
त्याच
अगतिकतेतून
दुसऱ्या
कोणाची तरी
सायकल चोरतो.
आपण सगळेच
त्या अर्थाने
चोर असतो -
दुसरा
कोणीतरी आपली
'सायकल' चोरतो,
वा आपले श्रेय
लाटतो; अन्
आपणही तेच
दुसऱ्या
कोणाच्यातरी
बाबतीत करतो.
'बायसिकल
थीव्हज्' हे
अनेकवचनी, मूळ
इटॅलियन
शीर्षक त्या
दृष्टीने
अधिक समर्पक
आहे. आयुष्य
रिते
झालेल्या, चोर
ठरलेल्या
अँटोनियोला
शेवटी
पुत्रप्रेमाचा
आधार सापडतो;
जो खूपदा
महात्म्यांनाही
लाभत नाही.
चित्रपटातले
हे आणखी एक
आगळे दर्शन.
चित्रपटातले शेवटचे दृश्य तर अविस्मरणीय आहे. आता संध्याकाळ झाली आहे. रोमचे रस्ते माणसांनी तुडूंब वाहताहेत. बापलेक अंधारात अस्पष्ट होत जातात. त्यांच्यावर खिळलेला कॅमेरा आता माणसांची ती विशाल गदीर् फ्रेममध्ये घेतो. बापलेकांचे स्वतंत्र अस्तित्व आता गदीर्त विरून जाते. एका माणसाच्या आयुष्यातील आशानिराशेचा खेळ आता सगळ्या मानवतेचीच कहाणी बनून जातो. सुन्न करणारा एक कलात्मक अनुभव समृद्ध करणारी आध्यात्मिक अनुभूती देऊन जातो.
- भानू काळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट