पाबलो पिकासो याचे 'कला हे एक असत्य आहे, पण त्यातून आपल्याला सत्याचा शोध घेता येतो' हे वचन प्रसिद्ध आहे. श्रेष्ठ कलाकृती आपली जीवनविषयक जाण समृद्ध करून जाते. 'बायसिकल थीफ' बघणे हा माझ्या दृष्टीने असाच एक जीवन समृद्ध करणारा अनुभव होता. वित्तोरिओ द सिका या इटालियन दिग्दर्शकाचा हा चित्रपट.
↧