प्रत्येकाच्या
पुढ्यात एक एक
लाकडी काठी
होती आणि
त्यावर ओळीने
लटकणारे
वीस-पंचवीस
वातीचे लांब
धागे. खालच्या
बाजूलाच एकेक
हीटर व
त्यावरच्या
एका भांड्यात
वितळलेले गरम
मेण. काठीवरून
एक एक धागा
काढायचा, गरम
मेणात बुडवून
पटकन वर
ओढायचा आणि
पुन्हा
काठीवर
लटकवायचा. मग
पुढचा दुसरा
धागा... मग त्या
पुढचा तिसरा...
सगळे धागे
मेणात बुडवून
झाले की,
पुन्हा
पहिल्या
धाग्यापासून
सुरुवात
करायची.
प्रत्येक
खेपेला त्या
त्या
धाग्याभोवती
मेणाचा नवा थर
जमा व्हायचा,
सुकायचा व
धागा पुन्हा
वितळलेल्या
मेणात
बुडवल्यावर
पुन्हा एक नवा
थर धाग्यावर
बसायचा.
हळूहळू त्या
धाग्यांभोवती
थरावर थर जमत
त्यांच्या
मेणबत्त्या
तयार झाल्या.
सकाळी आठला
सुरू झालेले
हे अनोखे काम
संध्याकाळी
सहा-साडेसहापर्यंत
चालू होते.
मध्ये
जेवणापुरता
आणि
कॉफीपुरता
थोडाफार खंड
पडला असेल
तेवढाच. काम
चालू असताना
त्यांचे
आपापसांत
हास्यविनोद
हेही चालूच
होते.
दुसऱ्या
दिवशी रविवार
होता. त्या
दिवशी सकाळी
त्यांच्या
स्थानिक
चर्चमध्ये
जाऊन त्यांनी
त्या
मेणबत्त्या
विकल्या.
मेणबत्त्या
विकून आलेले
दोनचारशे
क्रोनर्स
इथिओपियामध्ये
अन्नपदार्थांची
पाकिटे
पाठवणाऱ्या
एका संस्थेला
त्यांनी
दिले.
या
सर्व
प्रकाराबाबत
माझी दोन्ही
दिवस
अधूनमधून
नील्स-एरिकबरोबर
जी चर्चा होत
होती, ती मला
खूप उद्बोधक
वाटली. नील्स
एरिक सांगत
होता : 'आम्ही
एकत्र येतो,
हसतखेळत काम
करतो, ही सगळी
एकूण
प्रक्रियाच
अतिशय
आनंददायक आहे.
तिचं
मूल्यमापन
आम्ही किती
क्रोनर्स
उभारले
यावरून करताच
येणार नाही.
कदाचित
त्याहून
जास्त
क्रोनर्स मी
एकटासुद्धा
देणगी म्हणून
देऊ शकेन. पण
तो मुद्दाच
महत्त्वाचा
नाही.
इथिओपियातील
उपासमार
यामुळे
थांबणार नाही,
हेही अगदी उघड
आहे. पण जगातील
दैन्य कमी
करण्यातला
आमचा छोटासा
वाटा
उचलल्याचं
समाधान या
प्रकारात
आम्हाला
नक्कीच मिळतं.
शिवाय एकत्र
येण्यातला
आनंदही मिळतो.
असे एकत्र
यायचे क्षण
आमच्या
समृद्ध
समाजात आजकाल
खूप दुमिर्ळ
झाले आहेत.
गेले चार
महिने दर
वीकएंडला
आम्ही
स्वयंस्फूतीर्ने
असे एकत्र येत
आहोत. अशाच
प्रकारचं
काही ना काही
काम करत आहोत.
जाहिरातबाजी
न करता,
त्यागाचं
अवडंबर न
माजवता,
सातासमुदापलीकडील-
ज्यांना
आम्ही कधीच
भेटणार नाही
अशा- गरिबांना
मदत पाठवत
आहोत. आणि
त्याचवेळी
स्वत:साठीही
आनंद मिळवत
आहोत.' तसा
छोटासाच
अनुभव. पण
सामाजिक
कार्याचे
महत्त्व
मनावर कायम
कोरणारा.
सामाजिक
कार्याला
कोणी कितीही
नावे ठेवोत,
अशा
कार्यातील
'वैर्यथ्य'
कितीही
हुशारीने
मांडोत; पण
त्या हॉलमधील
सगळ्यांच्या
चेहऱ्यावरचा
आनंद, उत्साह,
स्वयंस्फूतीर्ने
गरजूंसाठी
स्वहस्ते
काहीतरी
प्रत्यक्ष
कृती करायला
प्रवृत्त
करणारी ती
करुणेची
भावना या
गोष्टी मला
फार मोलाच्या,
मानवी मनाचे
उन्नयन
करणाऱ्या
वाटतात.
माणसाला
'सिनिकल' व
म्हणून
निष्क्रिय
बनवणारे
काटेकोर
विश्लेषण
कितीही
'स्मार्ट' व
चमकदार वाटले
तरी अंतिमत: ते
जीवनविन्मुख
असते; याउलट
माणसाला
कार्यप्रवण
करणारे
विश्लेषण
काहीसे
बाळबोध, भाबडे
वाटले तरी ते
जीवनसन्मुख
असते व म्हणून
समाजासाठी व
त्या
व्यक्तीसाठी
सर्जनशीलही
असते.
सामाजिक
कार्य करत
असताना आपण
समाजावर
उपकार करत
नसतो. ते
करताना आपण
स्वत:लाही
घडवत असतो.
स्वार्थ आणि
परार्थ हे अशा
वेळी
परस्परविरोधी
न ठरता
एकमेकांना
पूरकच ठरतात.
इतरांसाठी
काही करताना
खरे तर आपण
स्वत:चीच एक
भावनिक गरज
भागवत असतो;
आपण देतो
त्यापेक्षा
मिळवतो
अधिक.
-
भानू
काळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट