Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing latest articles
Browse All 48 View Live

केळी आणि सामाजिक बांधिलकी

- भानू काळेपूर्वीच्या ब-याच हिंदी सिनेमांमध्ये स्मगलर्स असायचे. ते बोटीवरून किनाऱ्यावर सोने आणायचे. त्यांचे साथीदार ते ताब्यात घ्यायचे आणि पैशाची बॅग बोटवाल्याच्या स्वाधीन करायचे. सोने घेणारा ते तोलून...

View Article


मुनाफची बिर्याणी

महम्मद मुनाफला मी प्रथम बघितले तेव्हा तो तिशीतला होता. मी तेव्हा सातवी-आठवीत असेन. वर्णाने मुनाफ अगदी काळा होता. कपडे मात्र स्वच्छ पांढरे असायचे. बुटका बांधा. चापून मागे वळवलेले, तेल लावलेले केस. मूळचा...

View Article


राबणारी माणसे सुंदरच दिसतात

आपल्यावर लहानपणापासून कळत-नकळत होणाऱ्या संस्कारांतूनच आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान, आपले 'अध्यात्म' घडत जाते. या लेखात आईकडून झालेल्या संस्काराविषयी लिहावेसे वाटते.माझ्या आईचे नाव ललिता. कॉम्रेड तिला 'ल'...

View Article

योग: कर्मसु कौशलम्

'कोणी केलं रे हे बायडिंग?' हातातले जर्नल उंचावत गोताड बाईंडरनी घुश्श्यातच आजूबाजूच्या कामगारांना विचारले. कुठल्याही अस्सल बाईंडरप्रमाणे तेही 'बाईंडिंग'ऐवजी 'बायडिंग'च म्हणायचे. एक पोरगेलासा कामगार पुढे...

View Article

चार गोड शब्द

- भानू काळेपाचगणीच्या त्या परिषदेला आलेले ३०-४० प्रतिनिधी, एक दिवस सुट्टी होती म्हणून महाबळेश्वरला गेले होते. मी मागेच राहिलो होतो. माझी पत्नी वर्षा त्यांच्याबरोबर गेली होती. एसटीच्या बसमधून सगळा...

View Article


हम से आया न गया...

माझ्या परिचयातल्या एका कुटुंबातला हा अनुभव. तो तिचा सख्खा मुलगा होता. खूप देखणा, बुद्धिमान. मोठा झाला. उत्तम ठिकाणी नोकरीला लागला. पुढे एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्न करायचे ठरवले....

View Article

लोकैषणा आणि आत्मनिष्ठा

दि. १८ जानेवारी १९७७ची दुपार आणीबाणीविरोधातील मंडळी कधीच विसरणार नाहीत. मुंबईतल्या 'हिंमत' साप्ताहिकाच्या कार्यालयात आम्ही आठ-दहाजण बसलो होतो. रेडिओवरच्या बातम्या कानात प्राण आणून ऐकत होतो. इंदिरा...

View Article

चांगुलपणाचे ओझे

आपण एखाद्याशी चांगले वागलो तर तोही आपल्याशी चांगले वागतो असे हे बहुमान्य तत्त्व आहे. 'अच्छे काम का फल हमेशा अच्छा ही मिलता है' असे एक विधान एका हिंदी चित्रपटात नायिकेच्या तोंडी पुन:पुन्हा येत होते....

View Article


मालमत्ता फक्त मुलांनाच का?

त्या प्रशस्त बंगल्यात मालकीणबाई एकट्याच राहत होत्या. मुलगा प्रचंड शिकलेला, खूप कमावणारा. अर्थात अमेरिकेत. यजमान चार-पाच वर्षांपूवीर्च गेले होते. पत्नीच्या शेवटच्या दिवसांची भरपूर सोय करून. बाकीच्या...

View Article


... न मी एक पंथाचा!

आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा वर्षानुवषेर् जोपासलेली आपली काही मते चुकीची आहेत याची अचानक जाणीव होते. त्या क्षणी आपण भांबावून जातो, खूप अस्वस्थ होतो, पण जुन्या भूमिका सोडून देणे अवघड असते. मग आपण...

View Article

आपण आणि ते!

'आपण स्वत:चे मूल्यमापन आपल्या हेतूंवरून करतो; पण इतरांचे मूल्यमापन आपण त्यांच्या प्रत्यक्ष कृतींवरून करतो.' अगदी दैनंदिन जीवनातही एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण आपल्या वागण्याचा अर्थ कसा लावतो...

View Article

मूळचे आणि उपरे!

प्रवाशांनी गच्च भरलेली गाडी जलपैगुडी स्टेशनात शिरली आणि कसेबसे आम्ही डब्यात शिरलो. रात्रीची वेळ. त्याच दिवशी सुभाष घीशिंग यांच्या गुरखालँड समर्थकांनी १०० तासांचा सार्वत्रिक संप पुकारला होता. गुरखा हेच...

View Article

चंदूभाईंची 'फिलोसोफी'

- भानू काळेबिझिनेस मॅनेजमेंट हे आज शिक्षण क्षेत्रातले एक चलनी नाणे बनले आहे. पण या बिझिनेस स्कूल्समधून कधीच शिकवल्या जात नाहीत, अशा अनेक व्यावहारिक गोष्टी असतात. मुंबईतली प्रत्येक इंडस्ट्रीयल इस्टेट...

View Article


ब्रेड आणि सर्कस

पुण्याच्या आसपास काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अत्याधुनिक कारखाने उभे राहिले आहेत. अशाच एका कंपनीत काम करणाऱ्या मित्राबरोबर त्यांच्या 'अॅन्युअल डे'च्या निमित्ताने जायचा परवाच योग आला. ही कंपनी भारतातील...

View Article

स्वार्थ आणि परार्थ

सामाजिक कार्यासंबंधीचा एक जुना पण बोलका स्वानुभव सांगावासा वाटतो. स्टॉकहोमजवळ व्होल्व्हो या स्वीडिश कार कंपनीचा एक प्लॅन्ट आहे. नील्स-एरिक मोसेन हा तिथला एक इंजिनीअर. एका शनिवार सकाळची गोष्ट. तो राहत...

View Article


शत्रूदेखील माणूसच असतो

समोरचे दृश्य बघून सात वर्षांच्या हेन्रीचे डोळे भरून आले होते. तो सगळाच प्रकार त्याला विलक्षण क्रूरपणाचा वाटत होता. स्वित्झर्लंडमधल्या जीनिव्हा शहरात एका सरकारी गोदामातला माल बाहेर काढण्याचे काम चालले...

View Article

सुखाचा एक मंत्र

- भानू काळेजास्त शब्दांनी विचारांचा जीव गुदमरतो, असे विनोबा म्हणत. गहन संकल्पनाही सूत्ररूपाने मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचा नसला, तरी त्यांचा वाटावा, असाच जणू हा व्यावहारिक सुखाचा एक छोटेखानी...

View Article


तळपायावरच्या नोंदी

साताऱ्याला एका स्नेह्याकडे गेलो असतानाची गोष्ट. दुपारचे जेवण झाले. खूप पदार्थ केले होते आणि सगळे चविष्टही. जेवण झाल्यावर लक्षात आले, की प्रत्येक पदार्थ केलाही होता भरपूर. स्वैपाकाचा अंदाज चुकला असेल...

View Article

कर्तव्य हाच देव...

- भानू काळेआर्थर थॉमस कॉटनने मे १८२१ मध्ये भारतात पाऊल टाकले, तेव्हाच तंजावर हा शब्द प्रथम त्याच्या कानावर पडला. ईस्ट इंडिया कंपनीने त्याची तिथे नेमणूक केली होती. हा परिसर कायम दुष्काळी. जे पाहिले,...

View Article

सुभाषिते आणि म्हणी

सुभाषिते लिहून ठेवायचा छंद आपल्यापैकी अनेकांना असतो. 'स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी'पासून 'प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक आहे'पर्यंत अगणित सुभाषिते आपल्याला पाठ असतात. ती आठवली की...

View Article

गोरी गोरी पान

डरबन हे दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. महात्मा गांधींनी फिनिक्स सेटलमेंट हा आपला पहिला आश्रम १९०४ साली इथेच सुरू केला. एकदा डरबनला जायचा योग आला, तेव्हा या आश्रमात काही तास घालवायची इच्छा...

View Article


कलेतून अध्यात्माकडे

पाबलो पिकासो याचे 'कला हे एक असत्य आहे, पण त्यातून आपल्याला सत्याचा शोध घेता येतो' हे वचन प्रसिद्ध आहे. श्रेष्ठ कलाकृती आपली जीवनविषयक जाण समृद्ध करून जाते. 'बायसिकल थीफ' बघणे हा माझ्या दृष्टीने असाच...

View Article


खार आणि हनुमानती

तरुण होती, गर्भश्ाीमंत होती, विलक्षण कर्तृत्ववान होती. कोणालाही भारून टाकेल असेच तिचे व्यक्तिमत्त्व होते. ती म्हणत होती, ''गृहिणीच राहायचं होतं, तर एवढं शिक्षण तरी कशाला घेतलं? घर एके घर करण्यात आयुष्य...

View Article

अध्यात्म : न संपणारा प्रवास

- भानू काळेमाझे अध्यात्म म्हणजे माझे एकूण जीवनविषयक तत्त्वज्ञान या भूमिकेतून या लेखमालेतील आजवरचे लेख लिहिले असले तरी अध्यात्म शब्दाची व्याप्ती या भूमिकेच्या पलीकडेही आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच...

View Article
Browsing latest articles
Browse All 48 View Live